Maharashtra HSC Result 2022 कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.२१ टक्के निकाल

बुधवार, 8 जून 2022 (11:44 IST)
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आज होत आहे.
 
कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.२१ टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९०.९१ टक्के निकाल आहे. नागपूर विभागाने यंदा राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
 
विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातर्फे १७ जूनला गुणपत्रिका दिल्या जातील.
 
विद्यार्थी maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहू शकता.
 
राज्यातील १४ लाख ८५ हजार १९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
 
करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी बारावीची परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या परीक्षेबाबतही साशंकता होती. मात्र, यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने यंदा मार्च-एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती