Maharashtra HSC Result 2019: बारावीचा निकाल जाहीर

मंगळवार, 28 मे 2019 (11:48 IST)
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा (HSC) निकाल 28 मे रोजी जाहीर केला गेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. तर विभागवार निकालामध्ये कोकण अव्वल आहे.
 
यंदा राज्याचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. मागील वर्षी 2018 मध्ये 12 वीत एकूण 88.41 टक्के विद्यार्थी यशस्वी झाले होते. मागील वर्षापेक्षा या वर्षी निकाल 2.53 टक्क्यांनी घसरला आहे. 
 
mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. 
येथे पाहू शकता निकाल
maharashtraeducation.com
mahresult.nic.in
and mahahsscboard.maharashtra.gov.in.
 
तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी MHHSC बैठक क्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.
 
निकालाची वैशिष्ट्ये:
कोकण विभाग अव्वल तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी
 
विविध शाखांचा निकाल 
 
विज्ञान शाखा निकाल :92.60टक्के
कला शाखा निकाल :76.45 टक्के
वाणिज्य शाखा निकाल :88.28टक्के
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम :78.93 टक्के
 
गुण पडताळणीसाठी २९ मे ते ७ जून आणि छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. 
 
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. यंदा नऊ विभागातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 8 लाख 42 हजार 919 विद्यार्थी व 6 लाख 48 हजार 151 विद्यार्थीनी आहेत.
 
विज्ञान शाखेतून 5 लाख 69 हजार 446 
कला शाखेतून 4 लाख 82 हजार 372 
वाणिज्य शाखेतून 3 लाख 81 हजार 446
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 58 हजार 12 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती