राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (09:36 IST)
राज्यात पावसाचा जोर सुरूच आहे. सध्या राज्यात अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाया गेली. नुकसान झालेल्या भागात येऊन पिकांचे पंचनामे तातडीने करावे. अशी मागणी बळीराजा करत आहे. झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी देखील शेतकरी करत आहे.   
अवकाळी पावसामुळे ऊस ,कापूस, धान, हरभरा ,गहू पिके खराब झाली असून  शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. मात्र  महसूल प्रशासनाकडून अद्यापही 
कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहे .राज्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे  हरभऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले असून पिकांवर अळ्या लागत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना पडला आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती