होऊ दे दूध का दूध पानी का पानी- आशिष शेलार

मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (08:08 IST)
अडीच वर्षात राज्यात प्रकल्प यावे म्हणून तुम्ही प्रयत्न करून प्रस्ताव आणले असतील, यावर तुम्ही ठाम असाल तर माझ्या या मागणीला समर्थन करा. या अडीच वर्षाच्या काळामध्ये नेमके किती प्रस्ताव आले? किती कोटींचे आले? कुठल्या कुठल्या टप्प्यावर ते होते. ते प्रत्यक्षात सुरू झाले का? सुरू नाही झाले? या सगळ्याची अडीच वर्षाच्या काळातील निवृत्त मुख्य न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी...होऊ दे दूध का दूध पानी का पानी..," असे खुले आव्हान भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिले. आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला.
 
"पेंग्विनसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची आजची पत्रकार परिषद ऐकून पेंग्विनने डोक्याला हात मारला असता. आदित्यजी, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद आणि प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा धरत आहात हे विसरलात का? अडीच वर्ष तुमचे वडील मुख्यमंत्री होते. त्यांनी ना विधानसभेत एका प्रश्नाचे उत्तर दिले, ना विधानसभेच्या बाहेर कधी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वेगळा न्याय आणि दुसरे कोणी मुख्यमंत्री असताना वेगळा न्याय या पद्धतीच्या भूमिकेवर पेंग्विननेही डोक्यावर हात मारला असता," असा खोचक टोला त्यांनी लगावला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती