छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

लातूरच्या भोपनी गावात राहणाऱ्या एका तरुणीने  छेडछाडीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

संदीप दोडके असे छेडछाड करणाऱ्याचे नाव आहे. त्या तरुणीचे  लग्न ठरल्यानंतर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला फोनवरुन दोडके शिवीगाळही करत होता. त्यामुळे वैतागलेल्या तरुणीने आत्महत्ये केली.  

याप्रकरणी देवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी संदीप दोडके फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वेबदुनिया वर वाचा