‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 कायमचे थांबणार

सोमवार, 6 एप्रिल 2026 (13:34 IST)
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे १५०० रुपये कायमचे थांबणार, अशा बातम्यांनी सध्या अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, ही योजना सर्वांसाठी बंद झालेली नाही. केवळ ठराविक कारणांमुळे काही महिलांना यातून वगळण्यात आले आहे किंवा त्यांचे पैसे तात्पुरते रोखले गेले आहे.

कोणाचे १५०० रुपये थांबणार?
ज्या महिलांनी खालील गोष्टी केल्या नाहीत किंवा जे या निकषांत बसत नाहीत, त्यांचे पैसे थांबवले जात आहे.

e-KYC पूर्ण न करणे: सरकारने लाभार्थ्यांसाठी e-KYC अनिवार्य केले आहे. ज्या महिलांनी अद्याप आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करून ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे पैसे थांबवले जात आहे.

अपात्र लाभार्थी: पडताळणीमध्ये असे आढळले आहे की, अनेक महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नव्हत्या उदा. कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असणे, घरात चारचाकी असणे किंवा सरकारी नोकरी असणे. अशामहिलांना अपात्र ठरवून त्यांची खाती बंद करण्यात आली आहे.

चुकीची माहिती: अर्ज भरताना नाव, आधार क्रमांक किंवा बँक तपशील चुकीचे दिले असल्यास त्यांचे हप्ते जमा होणार नाहीत.

महत्त्वाची मुदतवाढ
सरकारने e-KYC आणि त्रुटी दुरुस्तीसाठी आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या महिलांनी अद्याप ही प्रक्रिया केली नाही, त्यांच्याकडे ही शेवटची संधी आहे. त्यानंतर मात्र कायमचे नाव वगळले जाऊ शकते.
ALSO READ: पुणे: बास्केटबॉल रिंग तुटल्याने बी.टेक विद्यार्थ्याचा मृत्यू; निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पोलिसांचे आश्वासन
थोडक्यात जर तुम्ही पात्र असाल आणि तुमची कागदपत्रे/KYC योग्य असेल, तर तुमचे पैसे थांबणार नाहीत. केवळ अपात्र आणि प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महिलांचेच पैसे थांबवले जात आहे.
ALSO READ: पुढील २४ तास धोक्याचे ! महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती