न्यायाविना खैरलांजीचा लढा लढणार्‍या भैय्यालाल भोतमांगेंचा मृत्यू

पूर्ण महाराष्ट्र आणि देशाला हलवणारया आणि माणुसकीला काळीमा फासलेल्या असा खैरलांजी अत्याचार प्रकरणात ज्यांच्या कुटुंबियांना ठार करण्यात आले आणि जे न्यायासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत होते ते अत्याचाराचे साक्षीदार आणि अत्याचारग्रस्त कुटुंबातील एकमेव जिवंत सदस्य भैय्यालाल भोतमांगे यांचे नागपूर येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने निधन झाले. ते शेवट पर्यंत न्यायासाठी लढत होते. तर २००६ मध्ये भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी या खेड्यात भोतमांगे कुटुंबाचे निर्घृण हत्याकांड घडले होते. 
 
या हत्याकांडातील एकमेव साक्षीदार असलेल्या भैयालाल यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या हत्याकांडात भैयालाल यांची पत्नी, दोन मुले,  मुलगी अशा चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. गेल्या ११ वर्षांपासून न्यायासाठीलढत होते. त्यामुळे आता तरी न्याय मिळेल का ? उपेक्षित समाजावर झालेला अत्याचार दूर होईल का असे प्रश्न समाजसुधारक बोलत आहेत.

वेबदुनिया वर वाचा