पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे, त्यामुळे धरणावरील दाब कमी रहावा व नवीन पाणी भरावे म्हणून खडकवासला धरणातून आज 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला , अजूनही विसर्ग होणार आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच असून , जोरदार पाणी साठा वाढत आहे.