आपला कुठलाही देव आणि महापुरुष बॅचलर नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची आता चर्चा सुरू झाली आहे. त्यावरुन, त्यांची खिल्लीही उडवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं. तसेच, मारुतीराया त्यांची भेट घ्यायला येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसा निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी देव आणि महापुरुषांबद्दल विधान केलं. आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाहीत. संसार करुन सगळं करता येतं. सेवा देखील करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याच रक्त हिरवं किंवा निळं आहे. परमेश्वराने कुठलाच भेद केला नाही. सगळ्यांना कॉमन करुन त्याने पाठवलं. सगळ्यांना दोन डोळे दोन कान आणि समान शरीर देवाने दिले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावरुन, आव्हाड यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
'आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत दादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या व सगळयांनी मारुतीकडे बघायला सुरुवात केली व मारुतीला चंद्रकांत दादांचं म्हणणं ऐकवलं. मारूतीने निर्णय घेतला आहे, कि लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत कि नाहीत ह्यावर सविस्तर चर्चा करणार', असे आव्हाड यांनी म्हटले. तसेच, संसार करून पण सगळं करता येतं असं महापुरुष व देवांना उद्देशून चंद्रकांत दादांनी म्हटलं आहे. त्यावर आता रामदास स्वामी काय उत्तर देतात ह्यावर आता सगळ्यांच्या नजारा लागल्या आहेत, असा टोलाही आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.