११ जून ला महाराष्ट्रात पाऊस येईल, हवामान खात्याचा अंदाज

बुधवार, 27 मे 2020 (07:20 IST)
येत्या एक आणि दोन जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण सर्वसामान्यपणे ११ जून रोजी महाराष्ट्रात पाऊस येईल आणि ८ ऑक्टोबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होईल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. त्यावर महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागात कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडून देऊ नका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच पावसाळ्यात रोगराई वाढणार नाही, याची काळजी घेण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाची मान्सनपूर्व आढावा बैठक बोलावली होती.
 
राज्यात पाउस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असेल. अल निनोचा प्रभाव पडणार नाही. ज्यामुळे गेल्या वर्षी उत्तरार्धात भरपूर पाऊस झाला तो इंडियन ओशन डायपोल देखील अनुकूल आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. गेल्यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के पेक्षा जास्त पाउस झाला होता अशी माहिती होसाळीकर यांनी यावेळी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती