फक्त जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तुस्थिती आहे- बाळासाहेब थोरात

सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (07:56 IST)
सत्यजित तांबे खूप चांगल्या मतांनी विजयी झाले. त्यांचे अभिनंदन आपण यानिमित्ताने करतो आहोत. फक्त जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबतीत मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहेत. असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
 
आमदार थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि.०५) शहरातील‎ जाणता राजा मैदान येथे आनंद,‎ मिलिंद, आदर्श व उत्कर्ष शिंदे‎ यांच्या उपस्थितीत ‘शिंदेशाही‎ बाणा’ या कार्यक्रमाचे आयोजन‎ करण्यात आले होते. त्यावेळी ऑनलाईन पद्धतीने आमदार थोरात यांनी संवाद साधला. ते म्हणाले, हे पक्षीय राजकारण आहे. हे बाहेर फार बोलले पाहिजे असे नाही, या मताचा मी कायम आहे. म्हणून त्याबाबत काय जे आहे. ते मी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय आणि जे काही करायचे ते योग्य पद्धतीने करू. त्याबाबत आपण काही काळजी करण्याचे कारण आहे, असे मला वाटत नाही. त्यामध्ये आपण पुढे जाऊ. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळामध्ये विधान परिषदेचे राजकारण सुरू होते. त्यामध्ये काही बातम्या अशा आल्या की, भारतीय जनता पक्षापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवले. एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटाचे वाटप सुद्धा करून टाकले. काही लोक कशा पद्धतीने गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. हे आपण पाहिलेले आहे. अनेक प्रकारच्या चर्चा त्यांनी घडवून आणलेल्या असल्या तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आतापर्यंत त्या विचाराने वाटचाल केली, पुढील वाटचाल सुद्धा त्याच विचाराने आपली राहणार आहे. यांची ग्वाही देतो. माझ्या मनातील भावना यानिमित्ताने मी बोलला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती