महाराष्ट्रात सर्व दुकानांवरील फलक अर्थात पाट्या सरसकट मराठी भाषेतच असायला हव्या ह्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगलेले असतानाच काही व्यापाऱ्यांद्वारे हया निर्णयाचा विरोध केला जातोय. अश्या व्यापाऱ्यांना मनसेचे संदीप देशपांडेंनी ट्विटर वरून धमकी वजा इशाराच दिला आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांबाबत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. “ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे. पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?” अश्या तिखट शब्दांत देशपांडेंनी विरोध करणाऱ्या व्यावसायिकांना मनसे स्टाईलने समाचार घेण्याचा इशारा दिला आहे.