लग्नाच्या नावाखाली लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा नाशिकमध्ये पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील बाजीराव नगर भागातील 'माऊली ग्रूम-ब्राइड सर्च सेंटर'च्या माध्यमातून लग्नाच्या नावाखाली लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आणि बुधवार, १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा जणांना अटक केली आहे.