यासोबतच ११ मे २०२२ रोजी सुद्धा संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी मंत्रालयात बैठक सुरु झाली. वैठक सुरु असतानाच ५ वाजून ३० मिनिटांनी मंत्रालयातील लाईट्स अचानक गेल्या. दरम्यान या दोन्ही वेळी लाईट्स गेल्यामुळे मंत्रालयात कामाचा खोळंबा झाला. दरम्यान रक्षाबंधांच्या दिवशी मंत्रालयातील कामकाज सुरु ठेवण्यात होते. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणांहून कामकाज पूर्ण करण्यासाठी लोकांची रीघ लागली होती. मंत्रालयात बाहेरून कामानिमित्त आलेल्या नागरिकांना प्रवेशासाठी पास देण्यात येतो. इंटरनेट सेवा बंद असल्याने हा पास नागरिकांना मिळू शकला नाही त्यामुळे मंत्रालयाच्या आवाराबाहेर नागरिकांची रीघ दिसुन आली.