मिळालेल्या माहितीनुसार, परळीच्या एका रुग्णालयात परिचारिका म्हणून कामाला असणाऱ्या एका तरुणीचे एका तरुणाशी प्रेम संबंध होते. तरुणाला प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यांचे या वरून वाद झाले आणि रागाच्या भरात त्याने तरुणीवर कोयत्याने वार करत तिची हत्या केली. घटनास्थळी तरुणीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.