महाराष्ट्रात सर्वाधिक महिला मद्यपी धुळे जिल्ह्यात तर पुरुष मद्यपी गडचिरोली जिल्ह्यात

गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (11:11 IST)
महाराष्ट्रात मद्यपान करणाऱ्यांची संख्या गेल्या तीन वर्षांत दुपटीने वाढली आहे. तसंच राज्यात सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर मद्यपी पुरुष गडचिरोली जिल्ह्यात आहेत अशी माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून समोर आली आहे.
 
तरुणी आणि महिलांच्या दारूच्या व्यसनामध्ये धुळे जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून व्यसनाची टक्केवारी 38.2 टक्के एवढी आहे तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून 34.7 टक्के एवढं दारूच्या व्यसनाचं प्रमाण आहे.
 
गडचिरोलीनंतर भंडारा, गोंदिया, वर्धा हे विदर्भातील तीन जिल्हे आघाडीवर आहेत. तर महिलांमध्ये धुळ्यानंतर गडचिरोली, नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
 
विशेष म्हणजे वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही तिथे व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक असल्याचं या अहवालातून उघड झालं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती