राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत पुन्हा 15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवला आहे. 31 मेपर्यंत निर्बंध कायम असणार आहे. यावेळी राज्य सरकारने काही नव्याने निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी केले तरच राज्यात प्रवेश मिळेल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्यात ज्यांना जायचे आहे आणि यायचे आहे, त्याच्यासाठी 48 तास आधीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. हा निगेटिव्ह रिपोर्ट असेल त्याला राज्यात आणि जिल्ह्यात प्रवेश करता येणार आहे.
सरकारने परराज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकार केला आहे. त्याशिवाय बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही. हा रिपोर्ट 48 तास आधी काढलेला असावा, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असणार आहेत.