शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती- संजय राऊत

बुधवार, 24 जानेवारी 2024 (09:44 IST)
नाशिक : शिवसेना नसती तर अयोध्येत श्री रामाची प्राण प्रतिष्ठा झाली नसती. शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले म्हणून पंतप्रधानांना प्राण प्रतिष्ठा करता आली, असा हल्लाबोल संजय राऊतांनी नाशिक येथे आयोजित राज्यव्यापी अधिवेशनात केला.
 
संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या महाशिबिराची सुरुवात झाली आहे. फक्त नाशिकचेच नव्हे, महाराष्ट्र्र नव्हे तर  संपूर्ण देशाचे वातावरण राममय झाले आहे. त्या वातावरणात उद्धव ठाकरेंनी महाशिबिराची ज्योत पेटवली आहे. प्रभू श्री राम से हमारा पुराना नाता है, प्रभू श्रीरामाशी शिवसेनेचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. शिवसेना नसती तर अयोध्येत श्री रामाची प्राण प्रतिष्ठा झाली नसती. शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले म्हणून पंतप्रधानांना प्राण प्रतिष्ठा करता आली.
 
ज्या ठिकाणी हे अधिवेशन होत आहे, हे धर्मक्षेत्र आहे. १९९४ साली जि लढाई आपण इथून सुरु केली होती तीच लढाई आता आपण पुन्हा करणार आहोत. जो राम अयोध्येला तो राम पंचवटीतला आहे. प्रभू रामाच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष नाशिकमध्ये झाला. म्हणून उद्धव ठाकरेंनी नाशिकचीच निवड का केली त्याला मोठे महत्व आहे.
 
रामाचे जे धैर्य तेच शिवसेनेचे धैर्य
श्री राम आणि शिवसेनेचे नाते असे आहे की, रामाचे जे धैर्य ते शिवसेनेचे धैर्य, रामाचे जे शौर्य तेच शिवसेनेचे शौर्य, आणि रामाचा जो संयम तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे. आमच्या शिवसैनिकांनी शौर्य होते म्हणून अयोध्येत जाऊन बाबरीचे घुमट पाडले आणि भारतीय जनता पक्षाकडे धैर्य नव्हते त्यामुळे बाबरी कोसळताच ते म्हणाले हे आमचे काम नाही. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे कडाडले आणि म्हणाले होय हे काम माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. हे बाळासाहेब ठाकरेंचे धैर्य.
 
उद्धव ठाकरे संधीची वाट पाहताय
महाराष्ट्र दिल्लीतील रावणशाही समोर झुकणार नाही. डरो मत, झुको मत आणि सत्याच्या मार्गाने चलो. आपण इथून लढण्याची सुरुवात करत आहे.  श्रीरामाने संधीची वाट पहिली तसच उद्धव ठाकरे संधीची वाट पाहत आहेत. तुम्ही तुमच्या विष्णूच पूजन करा आम्ही रामाचे करतो. राम संघर्ष करून बाहेर आला आणि तो भगवान झाला, असेही संजय राऊत म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती