आरोग्य संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ८.८ लाख लोक हायपरटेंशनच्या विळख्यात अडकले आहेत. म्हणजेच, महाराष्ट्रातील एकूण ३० टक्के लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास आहे. त्यात २० ते ६० वयोगटातील लोकांचा सर्वात जास्त समावेश आहे.
आरोग्य संचालनालयाच्या असंसर्गजन्य आजार नियंत्रण विभागाकडून राबवण्यात आलेल्या शिबीरांमार्फत गेल्या ५ वर्षात २ कोटी ६८ लाख लोकांची तपासणी केली गेली आहे. त्यात ८.८ लाख लोकांना उच्चरक्तदाब असल्याचं समोर आलं आहे. ज्याचं प्रमाण शहरी भागात ३० टक्के आहे. तर, ग्रामीण भागात हे प्रमाण ५ ते १० टक्के आहे. तसंच, ८.८ लाख लोकांपैकी जवळपास ७.७ लाख लोकांनी हायपरटेंशनवर वेगवेगळ्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आहेत, अशी माहिती असंसर्गजन्य रोगनियंत्रण विभागाच्या सह संचालक डॉ. साधना तायडे यांनी दिली आहे.