राज्यभरात उन्हाची प्रचंड लाट

बुधवार, 16 मार्च 2022 (13:43 IST)
उत्तर तसंच पश्चिमेकडील या परिसरातून उष्ण आणि कोरडे वारे उत्तर कोकणाच्या दिशेनं वाहात आहेत. त्यामुळे या परिसरात तापमानात वाढ झाली आहे.
 
हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला 14 ते 16 मार्चच्या तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, खानदेश, सोलापूर, नांदेड, परभणीसह मुंबई परिसरात तसंच पणजीमध्येही गेल्या दोन दिवसांपासून पारा नेहमीपेक्षा जास्त वर चढत आहे.
 
उष्णतेची लाट पाहता गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं, उन्हात फिरणं टाळावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
 
गेल्या आठवड्यात नाशिक, पुणे परिसरात पावसाच्या सरीही कोसळल्या. मार्चमध्ये वातावरणात असे चढउतार आढळून येणं नवीन नाही. अशा वातावरणात उष्माघात होऊ शकतो, म्हणून काळजी घ्यावी असं तज्ज्ञांनी म्हटलंय.
 
 "16 मार्चपर्यंत मुंबई, ठाणे, कोकण आणि पालघर भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती