सध्या पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण परस्पर वादाचे असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणांनी जिलेटिनचा वापर करून मशिदीत स्फोट घडवून आणला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.
रविवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास गावप्रमुखांनी तलवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोटामुळे मशिदीच्या आतील भागाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कनवट आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब निकामी पथकासह फॉरेन्सिक शास्त्रज्ञांची एक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
कनवट म्हणाले की, मशिदीत झालेल्या स्फोटाप्रकरणी बीड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. कानवट यांनी लोकांना अफवा पसरवू नका आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.