मला कसे मंत्रालयात येता येईल? अशी मश्किल टीप्पणी केली आठवलेंनी

सोमवार, 14 डिसेंबर 2020 (16:14 IST)
राज्य सरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? अशी मश्किल टीप्पणी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली आहे. याबाबत रामदास आठवलेंनी ट्विट केलं आहे.  
 
ड्रेसकोडच्या मार्गदर्शक तत्वानुसार सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जीन्स, टीशर्टसह गडद रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे घालता येणार नाहीत, कर्मचाऱ्यांना सरकारी कार्यालयात स्लीपर्स घालता येणार नाहीत. महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार, चुडीदार कुर्ता आणि आवश्यकता असल्यास दुपट्टा वापरावा असं नमूद करण्यात आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती