परतीचा जीवघेणा पाऊस वीज पडून ११ नागरिकांचा मृत्यू

शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (12:56 IST)

राज्यात  अनेक  ठिकाणी परतीचा जोरदार पाऊस झाला आहे. मात्र हा पाऊस जीवघेणा ठरला आहे. यामध्ये वीज पडून काल दिवसभरात  शुकवार  अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी मुंबई उपनगरं, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे आणि  विदर्भाच्या काही भागात परतीच्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून  आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी दैना झाली होती.मात्र या पावसात अनेकांना  जीवही गमवावा लागला आहे.

मृत्यू पाहता उआम्ध्ये प्रथम सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झालाआहे, तर वीज इतकी भयानक पडली की  पाच जण जखमी झाले. पालघरमध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू, धुळ्यात तीन महिला, जालन्यात एक आणि मुंबईत एकाचा वीज पडून बळी गेला आहे. तर मुसळधार पाऊस इतका भयानक होता की  घरांवरची छप्पर उडाली आहेत. तर कापणीला आलेल्या  पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणं जनावरंही दगावली आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती