महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता १ ऑगस्ट ऐवजी या तारखेला

सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (08:31 IST)
महाराष्ट्रातील अभूतपूर्वी राजकीय आणि सत्ता संघर्षाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एस व्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे होत आहे. ही सुनावणी १ ऑगस्ट रोजी होण्याचे प्रस्तावित होते. मात्र, आता ही सुनावणी १ ऑगस्ट ऐवजी ३ ऑगस्टला होणार आहे.
 
शिवसेना पक्षामध्ये मोठी बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तब्बल ४० आमदारांनी बंड केले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार पायऊतार होऊन शिंदे आणि भाजप यांचे नवे सरकार स्थापन झाले. शिंदे यांनी विधानसभेत नवा गट स्थापन केला. त्यापाठोपाठ १२ खासदारांनाही फोडले. त्यामुळे लोकसभेतही नवा गट स्थान करण्यात आला आहे. त्याचबरोबर शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा सांगत निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. हे सर्व शिंदे गटाकडून होत असताना या सर्व बाबींना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने सर्वोच्च नायायलयात दाद मागितली आहे. तसेच, शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या निलंबन कारवाईवरही सर्वोच्च न्यायालयात शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत शिंदे, शिवसेना आणि राज्यपाल असा तिघांच्यावतीने घमासान युक्तीवाद करण्यात आला. हा हे प्रकरण संविधानिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असल्याचे मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले होते. त्यामुळेही या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती