हरिभाऊ यांच्याविरोधात विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत

सोमवार, 5 मार्च 2018 (15:29 IST)
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा अध्यक्ष सदन चालवताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणी आज विरोधकांनी मंत्रालयात पत्रकार परिषदही घेतली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे विरोधी पक्षांना सापत्न वागणूक देतात. त्यामुळे विरोधी पक्षांचा अध्यक्षांविरूद्ध अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणला जाणार आहे अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत  आहे.
 
मागील दोन दिवस सरकारी पक्षाकडून सभागृहाचं कामकाज होऊ दिलं जात नाहीये, त्यामुळे सरकार विरोधी पक्षाच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाही. राज्यपाल अभिभाषणवर उत्तरही न देता विधानसभा अध्यक्षांनी मतदान घेऊन टाकलं त्यामुळे ही घटनेची पायमल्ली आहे. सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही. अशी सरकारची भूमिका दिसते. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणायचं ठरवलं आहे.’असं विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आहेत. अनेक विषयांवरून सध्या विधासभेचे कामकाज गाजत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती