सोनेच उठले नागरिकाच्या जीवावर स्थानिकांना धोका

मंगळवार, 15 जानेवारी 2019 (17:36 IST)

उल्हासनगर शहरात असलेल्या सोनारगल्ली परिसरात जवळपास ३०० सोनरांची दुकाने असून यामध्ये सोन्याची चाचणी करण्यासाठी धोकादायक पद्धतीने अॅसिड वापर केला जातो. यामुळे स्थानिक रहिवाशांना धोका निर्माण झाल्याचा आरोप मनसे संघटक दिनेश आहुजा यांनी केला असून त्यांनी स्थानिक पोलीस ठाणे, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. उल्हासनगर कॅम्प १ येथील सोनारगल्ली आहे. सोने खरेदी साठी ग्राहकांची जोरदार वर्दळ असते.सुमारे ३०० सोनारांची दुकाने आहेत. दुकानात सोनं विताळण्यासाठी ऍसिडचा वापर करतो. प्रत्येकाजवळ साधारण ३५ लिटर अॅसिडचा ड्रम आपल्याकडे ठेवत आहे. सोन्याच्या चाचणीनंतर अॅसिडचे हे पाणी नाल्यात सोडतात. त्यामुळे जर एखाद्या वेळेस आग अथवा अनुचित प्रकार घडला तर येथील अरुंद गल्लीतुन अग्निशमन दलाची गाडी सुद्धा पोहोचणार नाही. यासंदर्भात ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वलेचा यांना विचारले असता ते म्हणाले, की ”हा प्रकार धोकादायक आहे त्यामुळे हे काम नियोजित रित्या केले पाहिजे. काही सोनार भाड्याने घरे घेतात आणि त्यामध्ये सोने विताळण्याचे काम करतात. यासाठी व्यावसायिक गाळे बनवले पाहिजेत आणि सांडपाण्याची व्यवस्था देखील चांगल्या रीतीने झाली पाहिजे.” आता यादृष्टीने ठोस पावले कधी उचलण्यात येणार हे येणारी वेळच सांगेल. त्यामुळे आता सोनेच जर जीवावर उठणार असेल तर कारवाई झाली पाहिजे असे नागरिक म्हणत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती