लोहगाव विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त

मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (09:12 IST)
लोहगाव विमानतळावर कस्टम विभागाने दोन तस्करांकडून 3159.55 ग्रॅम (जवळपास सव्वातीन किलो) सोने हस्तगत केले. याची किंमत बाजारात सुमारे एक कोटी रुपये इतकी आहे. यावर्षी लोहगाव विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्यांना पकडल्याची ही सोळावी घटना आहे.
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुबईवरुन पुण्याला आलेल्या फ्लाईट आईएक्‍स- 212 मधील प्रवाशी उतरल्यानंतर त्यांच्या साहित्याची नियमीत तपासणी केली जात होती. यावेळी दोन प्रवाशांवर संशय आल्याने त्यांच्याकडील साहित्याची कसून तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे जवळपास सव्वातीन किलो सोने सापडले. यामध्ये सोन्याची वायर, चेन आणी बिस्कीटांचा समावेश होता. त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी सोने दुबईवरुन आणल्याचे सांगितले. पुण्यात उतरल्यावर ते एका व्यक्तीकडे सोपवण्यात येणार होते. त्यांच्यावर कस्टम कायदा 1962 च्या 108 कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या दोन्ही तस्करांची नावे उघड करण्यात आली नाहीत. त्यांनी हे सर्व सोने एलईडी लाईटमध्ये लपवून आणले होते. यामध्ये 59 गोल्ड प्लेटस डिजीटल ऍप्लिफायरच्या छोट्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लपवले होते. ऑगस्ट महिन्यातच कस्टम विभागाने चार किलो सोने पकडले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती