साधारपणे एक महिन्यापूर्वी उत्तम नगर येथील एकता चौक परीसरात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली होती. तेथील स्थानिक नागरिकांनी दीड किलो पितळाच्या “दत्ताची मूर्ती” ची व मंदिराची स्थापना मोठ्या थाटामाटात व उत्साहात केली. त्या घटनेस एक महिना पूर्ण होत नाही, तोच चोरट्यांनी थेट याच देवाच्या मंदिरातच हात घालून मूर्तीची चोरी केली आहे.