गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणपत्ती बाप्पा विराजमान

बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (15:29 IST)
गोदावरी एक्सप्रेसमध्ये मनमाड येथून गणपत्ती बाप्पा विराजमान झाले आहे. गेल्या २५ वर्षा पासून मनमाड येथून सुटणा-या गोदावरी एक्सप्रेस मध्ये श्रीगणेशाची स्थापना करण्यात येते. ती आजही कायम आहे. मनमाडहून नाशिक प्रवास करणारे चाकरमाने धावत्या एक्सप्रेस मध्ये हा गणेशोत्सव साजरा करतात. आज सकाळी आरती झाल्यानंतर सर्व चाकरमान्यांनी नाचण्याचा आनंद घेतला आणि गोदावरी एक्सप्रेस आपल्या पुढच्या प्रवासाला निघाली आणि त्याच बरोबर गणपती बाप्पा दहा दिवसाचा प्रवास सुरु झाला. धावत्या ट्रेन मध्ये गणेशाची होणारी स्थापना हा सर्वत्र चर्चा विषय ठरत असतो. या गणेशोत्सवात पासधारकांची बोगी अत्यंत आकर्षक सजावट करुन विविध सामाजिक संदेशाचे फलक गाडीत लावण्या आले. कोरोनाच्या दोन वर्षाचा कालखंडात ट्रेन बंद जरी असली तरी रेल्वे वर्कश़ॉप मध्ये असलेल्या गाडीच्या ऐका बोगीत बाप्पाची स्थापना होत होती. यंदा गाडी सुरु झाली कोरोनाच संकट कमी झाल्याने पुन्हा त्याच उत्साहात या ट्रेन मध्ये दहा दिवसांसाठी गणपती विराजमान झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती