फ्लॅट देण्याचे आश्वासन देत 4 कोटी रुपयांची फसवणूक

शनिवार, 15 जून 2024 (18:54 IST)
सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार जास्त वाढले आहे. ठाण्यात फ्लॅट खरेदीदारांची 4 कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला असून या बाबत महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. फ्लॅट देण्याचे आश्वासन देत 18 जणांची फसवणूक करण्यात आली आहे. संतोष बाबुराव वाघमारे, विनायक दिगंबर वाकणकर आणि जगदीश भाले अशी या आरोपींची नावे आहे.  

सदर प्रकरण फेब्रुवारी 2017 ते जून 2024 दरम्यानचे आहे. संतोष वाघमारे हे अनेक बांधकाम कंपन्यांचे मालक आणि भागीदार आहे,तर विनायक वाकणकर हे सहकारी बँकेचे माजी सहायक व्यवस्थापक आणि जगदीश भाले हे बँकेचे तत्कालीन वरिष्ठ लिपिक आहे.
महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संतोष वाघमारे यांनी त्यांच्या प्रकल्पातील सदनिका मध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्याच्यासाठी पैसे देखील घेतले त्याने बनावट सह्या करून बँकेतून कर्ज मंजूर केले आणि 4 कोटी रुपयांची फसवणूक केली. 

बँकेने कर्ज मंजूर केल्यावर पीडितांच्या  माहिती शिवाय वाघमारे यांचा खात्यात पैसे जमा झाले  पैसे घेऊन देखील संतोष यांनी फ्लॅट दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे पीडितांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांशी सम्पर्क साधत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती