मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात शनिवारी एक मोठा अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या डंपरला धडक दिली. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेसह दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सर्वांना रुग्णवाहिकेने सीएचसीमध्ये नेण्यात आले जिथे चार जणांना मृत घोषित करण्यात आले.