प्रथम वर्ष पदवी प्रवेश रद्द, सर्व प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश

शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (15:28 IST)
शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द करून सर्व प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश राज्य सरकारकडून विद्यापीठांना देण्यात आले आहेत. 
 
मराठा आरक्षणास तूर्त स्थगिती देताना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या झालेल्या प्रवेशांमध्ये बदल करू नये, असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशांमध्ये बदल होणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. अद्याप प्रवेश प्रक्रिया न झालेल्या वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेत यंदा आरक्षण लागू होणार नाही. पण राज्यातील बहुतेक विद्यापीठांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवीची प्रवेश प्रक्रिया झाली आहे, तर अकरावी, पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती