भयंकर, दारूसाठी त्याने पत्नीला मारले

शनिवार, 15 जून 2019 (10:19 IST)
ठाण्यात दारु आणायला उशीर केला म्हणून एकाने आपल्या पत्नीला एवढे बेदम मारले की तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी पती प्रवीण पूर्विया (३०)व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.  
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतनगरमधील प्रवीणने आपली पत्नी संतोषीला वय २५, दारु आणण्यास सांगितले. ती लवकर येत नाही म्हटल्यावर त्याचा पारा चढला. संतोषी घरी येताच प्रवीणने तिला दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. लाथा बुक्क्या तसेच दांडक्याने संतोषीला त्याने एवढ्या निर्दयपणे मारले की तिचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे राहत असलेल्या इमारतीच्या व्हरांड्यात हा प्रकार घडला. मारहाणीची घटना गुरुवारी घडली. त्यानंतर प्रवीण फरार झाला होता. मात्र आता त्याला पोलिसांनी अटक केली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती