साथीचे रोग विदर्भातील यवतमाळचे नागरिक हैराण झाले

शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (08:06 IST)
यवतमाळ जिल्ह्यात सध्या साथरोगाने थैमान घातल्याने येथिल वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महदविद्यालयात सध्या दिवसागणिक रुग्णाची संख्या वाढत आहे यामध्ये सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागातील आहेत आणि यामुळे महाविद्यालयची ओपीडी सध्या हाऊसफुल्ल झाली आहे .
 
यवतमाळ मध्ये आठवडा सुरु झाला आणि ओपीडी मध्ये सर्वाधिक २७२८ रुग्ण उपचारासाठी येथे आले होते त्यानंतर दरदिवशी हि संख्या २ हजाराच्या पुढे आहे पूर्वी याच ७०० च्या जवळ रुग्ण महाविद्यालयात यायचे आता मात्र हीच संख्या २ हजाराच्या पुढे झाली आहे. तुटपुंजी यंत्रणा असताना योग्य उपचार पध्दतीमुळे रुग्णाची संख्या वाढली आहे ..
सध्या रुग्णालयात  मागील काही दिवसात ६५ रुग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर एप्रिल पासून आता पर्यंत डायरियाचे १३०० रुग्ण आढळेल आहेत तर स्क्रब टायफ़ास चे १७ रुग्ण आता पर्यंत आढळले असून मागील वर्षी कीटकनाशकाच्या फवारणीतून ७०० व्यक्तींना विषबाधा झाली होती आणि २२ शेतकरी शेतमजुरांचा मृत्यू झाला होता मात्र यावर्षी जनजागृती आणि योग्य उपचार मुळे अनेकांचा जीव वाचला आहे कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यंदा १४२ रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झाले मात्र योग्य उपचार मुळे मृत्यू संख्या शून्य ठेवण्यास यश आले आहे असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता यांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती