नाशिकमध्ये भीषण अपघात, टेम्पो आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार एका पिकअप ट्रकने मागून लोखंडी रॉडने भरलेल्या आयशर ट्रकला धडक दिली. या अपघातात सुमारे पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नाशिकमधील द्वारका सर्कल येथे हा अपघात झाला. सध्या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात संध्याकाळी 7.30 वाजता अय्यप्पा मंदिराजवळ घडला. त्यावेळी टेम्पोमध्ये सुमारे 16 प्रवासी होते जे सिडको परिसरात जात होते. निफाडमध्ये होणाऱ्या एका धार्मिक कार्यक्रमातून लोक परतत होते. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. काही लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि काही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.