'त्या' शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन

सोमवार, 29 जानेवारी 2018 (08:47 IST)
काही दिवसांपूर्वी  मंत्रालयात विष प्राशन केलेले  शेतकरी धर्मा पाटील (80) यांचे मुंबईतील जेजे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22  जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन वेळा धर्मा पाटील यांचं डायलिसीस करण्यात आलं होतं. मात्र प्राण वाचवण्यात अखेर अपयश आले. धर्मा पाटलांच्या मुलाने अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्यानुसार निकामी न झालेले अवयव दान करण्यात येतील.

धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती