राऊतांवर ईडीने कारवाई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गप्प का ?यांनी भूमिका स्पष्ट केली

गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (20:21 IST)
शिवसेना नेते राऊतांवर ईडीने कारवाई केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गप्प का, असा सवाल विचारला जातोय. यावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की,  "असे काही नाही. लोकसभेत ईडीच्या कारवायां संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खासदार सुप्रिया सुळे देखील याबद्दल आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. अनेक विरोधी पक्षांनी म्हंटलं आहे की हा कायदा राक्षसी आहे. हा कायदा युपीएच्या काँग्रेसच्या काळातच बनवला गेला आहे. चिदंबरम यांनीच या संदर्भातील कायदा बनवला होता. त्यामुळे या संदर्भात भाजपला तरी काय नावं ठेवणार?"
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही असं कळलं. त्यांनी काळजी घ्यायला हवी. रात्री २ पर्यंत ते जागतात, प्रवास करतात. आपल्याला पण देह आहे, त्या शरीराची एक परिसीमा आहे. त्यामुळे दोनच मंत्री असले तरी कामातून थोडी विश्रांती घेतली पाहिजे". 
 
"एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीतच होते. त्यामुळे आता प्रभाग रचना का बदलली हे सांगता येणार नाही. जे उमेदवार असतात त्यांचा वॉर्ड बदलला तर त्रास सगळ्यांनाच होतो. तसेच राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत करा. 92 नगरपालिका, 4 नगरपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही. बांठिया कमिशनमध्ये ओबीसींची संख्या कमी दाखवली जात आहे. अनेक त्रुटी आहेत. त्यासाठी तुम्ही यात लक्ष घालावे", असे भुजबळांनी अधोरेखित केले. 
 
तर 5 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल का याबाबत माहिती नाही. याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत. अनेक याचिकांची गुंतागुंत सुप्रीम कोर्टातच चालू आहे. ती कशी सुटते ते बघूया, असा सावध पवित्रा त्यांनी घेतला. दरम्यान,संजय राऊतांच्या अटकेबाबत ते म्हणाले की. "ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच आहेत.
 
राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाकडून Orange Alert देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
 
पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी मध्यम ते हलक्य स्वरुपाचा पाऊस असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, या जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार अति पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा, वाशिम, अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती