मागील वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे राज्यातल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर 5 हजार 500 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये विहिरी कोरडय़ा पडल्या असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. आजच्या घडीला राज्यात सुमारे 4 हजार 594 टँकरनी वाडय़ावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात सध्या अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खासकरून मराठवाडय़ाला मोठा फटका बसला आहे. मराठवाडय़ात सध्या 2 हजार 470 टँकरनी वाडय़ावस्त्यांची तहान भागवली जात आहे.