छ्त्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून राजकारण करू नये, राज्य सरकार मोठा पुतळा उभारणार -देवेंद्र फडणवीस

मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (18:31 IST)
सिंधुदुर्ग जिल्यातील मालवण तालुक्यात राजकोट किल्ल्यावर 2023च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा सोमवारी कोसळला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.या वरून विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून महायुती सरकारवर टीका होते आहे. 

यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, हा पुतळा नौदलाने बांधला आहे राज्य सरकारने नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळले हे दुःखद आहे. या मुद्द्यावर राजकारण करू नये. या ठिकाणी आता राज्यसरकारछत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा बसवणार आहे .

हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर नौदलाने बांधल्याचे फडणवीस म्हणाले. मला असे वाटते की हे करत असताना, जबाबदार व्यक्तींनी वाऱ्याचा वेग यासारख्या महत्त्वाच्या स्थानिक घटकांकडे दुर्लक्ष केले असावे.

त्यात वापरण्यात आलेल्या लोखंडाच्या दर्जामुळे, सागरी वाऱ्यांच्या संपर्कात आल्याने मूर्तीला गंज लागण्याची शक्यता बळावली होती. पुतळा बनवण्यापूर्वी निर्मात्यांनी सर्व बाबी समजून घेतल्या होत्या का?, असा सवाल त्यांनी केला. पुतळा कोसळल्याची चौकशी सुरु आहे. त्याचा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. 

या प्रकरणी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिताच्या कलमांतर्गत इतरांचे जीवन धोक्यात टाकण्याचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली आरोप दाखल करण्यात आले आहे. 
Edited by - Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती