.पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये – बावनकुळेंचे आवाहन

बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (21:29 IST)
मुंबई : गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्षाची वेळ आपल्यावर आली. माझ्याविरोधात कोणीही अफवा उठवू नयेत. ईश्वर न करो आयुष्यात मला काही निर्णय घेण्याची वेळ येवो. असा निर्णय घेणे हे खूपच दु:खदायक असते, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली होती. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली आहे.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, चौकशीत पंकजा मुंडे या योग्य उत्तर देतील, त्या आमच्या नेत्या आहेत. त्यांनी खूप काम केले आहे, भाजप त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ असा काढू नये की, त्या वेगळ्या निर्णय घेतील. ते पुढे म्हणाले की, त्यांच्या रक्तात भाजप आहे. त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये. अडचणीच्या काळात त्यांना काही नोटीस आली असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करेल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
 
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले की, प्रत्येक समाजाला आरक्षण पाहिजे, त्यासाठी केलेल्या मागण्या त्या समाजाचा अधिकार आहे. ओबीसींचे आरक्षण जाऊ नये, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी बसला आहे. सरकार कुणावरही अन्याय करणार नाही, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती