याप्रसंगी गटनेते प्रमोदशेठ देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नामदार डॉ भारती पवारांच्या रुपाने केंद्रीय मंत्रीपद देऊन अनेक वर्षांपासून प्रतिक्षीत न्याय दिला असे प्रतिपादन केले व भारतीय जनता पार्टी,दिंडोरी तालुक्याच्या वतीने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
प्रथम महिला केंद्रीय मंत्रीपद खा. भारती पवार रुपाने नाशिक जिल्ह्यास प्राप्त झाले आहे तसेच अभ्यासपूर्ण कर्तव्यपुर्ती ,शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रश्न संसदेत मांडणे व त्यास योग्य पाठपुराव्याने तडीस नेणे या व इतर कार्यकुशल गुणांची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेत उच्चशिक्षित महिला प्रतिनिधीस मंत्रीपदाची ही संधी देऊन योग्य व पात्र व्यक्तिमत्वास जनतेच्या भावना ओळखून त्यांचा एक प्रकारे सन्मानच केला अशी भावना भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस तथा नगरसेवक तुषार वाघमारे यांनी व्यक्त केली. तसेच मिळालेल्या मंत्रीपदाचा दिंडोरी तालुका तसेच लोकसभा मतदारसंघासाठी अधिकतम ऊपयोग करून डॅा. भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक दृष्टिकोन ठेवूनच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यरत रहातील असे सांगितले.