धुळ्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक रमेशसिंग परदेशी सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रमेशसिंग यांच्या सेवा निवृत्तीला अवघे ४ महिने शिल्लक राहिले होते. मात्र, रात्री त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस त्यांच्या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.