महाराष्ट्रातील धसई गाव ठरले देशातील पहिले कॅशलेस गाव

शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (10:49 IST)
ठाणे- डिजीटल घेण-देणवर भर देण्यासाठी केंद्राच्या प्रयत्नासोबतच ठाणे जिल्ह्यातील धसई गाव महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव म्हणून समोर आले आहे. राज्य वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. 
या गावात गुरुवारापासून सर्व भुगतान कार्डद्वारे करण्यात येत आहे. व्यापारी, भाज्या आणि फळ विक्रेता व इतर वस्तू व सर्व्हिस प्रोवाइडर या गावात कॅशलेस घेण-देण करण्यासाठी स्वाइप मशीन वापरत आहे.
 
त्यांनी म्हटले की पंतप्रधान मोदी यांनी 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बाहेर करून काळा पैसा आणि भष्ट्राचाराविरूद्ध मोठी जंग छेडली आहे. त्यांनी जे स्वप्न दाखविले त्या दिशेतच हा प्रयास आहे. जसे धसई गावा पहिले कॅशलेस गाव म्हणून समोर आले आहे तसेच महाराष्ट्रही लवकरच कॅशलेस राज्य बनणार.

वेबदुनिया वर वाचा