बेहिशेबी प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक

गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (09:29 IST)
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ५७ लाख रुपयांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि बाजार समितीचे सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांना बुधवारी चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. याबाबत कर्मचाऱ्यानी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई केली आहे.
 
साधारपणे तीन महिन्यापूर्वी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पेठरोडवर स्विफ्ट डिझायर (एमएच १५ सीएम २१८०) कारमधून ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली होती.  त्यानंतर याप्रकरणी बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणारे सानुग्रह अनुदान, बक्षीस वेतनाची रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम बँक मॅनेजरशी संगनमत करून परस्पर काढून जवळ बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तीनदा चौकशी केल्यानंतर सदरची रक्कम बाजार समितीची नसल्याचे समोर आले आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांना वाटप केली जाणारी लाखो रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या ताब्यात कशी तसेच बॅँकेतून परस्पर रक्कम कशी काढली होती. ही रक्कम डिए  आणि भविष्य निर्वाह निधी असल्याचे उघड झाले असून संचालक मंडळाने कर्मचारी वर्गावर सक्ती केली होती की ही रक्कम प्रतिज्ञा पत्रावर शि घेतली होती. याबाबात कर्मचारी वर्गाने पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला होता.त्यावरून  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंगळे यांची चौकशी केली मात्र तीवेळेस चुकीचे आणि न पटणारे कारणे दिले असल्याने आज त्यांना विभागाने अटक केली आहे.

वेबदुनिया वर वाचा