दिल्लीहून बोलवत नाहीत, तोपर्यंत मीच मुख्यमंत्रीपदी राहणार आहे, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सोबतच रावसाहेब दानवेदेखील प्रदेशाध्यक्ष पदावर कायम असतील, असेही स्पष्ट केले आहे. ‘माझे आणि दानवेंचे पद पक्के आहे. आम्ही कुठेही जाणार नाही,’ असे स्पष्ट केले आहे.
‘दानवे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन दूर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही यापुढेही निवडणुका लढवू,’ असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. दानवेंच्या गच्छंतीसोबतच फडणवीसांना केंद्रात जबाबदारी दिली जाणार असल्याच्या शक्यताही वर्तवल्या जात होत्या. मात्र ‘दिल्लीतून आदेश येत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्रीपदावर असेन,’ असे म्हणत त्यांनी दिल्लीवारीची शक्यता फेटाळून लावली.