राज्यातील जी आकडेवारी होती त्यात मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा उल्लेख होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या आकडेवारी नुसार मुंबई शहर जिल्ह्यात 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी मिळालेल्यांमध्ये मुंबई उपनगरापेक्षा मुंबई शहरातील शेतकरी जास्त आहेत. मुंबई शहरात नक्की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री जरी स्पष्टीकरण करत असले तरीही जो पर्यंत हे शेतकरी कोण आणि कुठे शेती करतात ते जो पर्यंत समोर येत नाहीत तो पर्यंत हा वाद सुरूच राहणार आहे.