गरजू शेतकऱ्यांचं कर्ज 31 आॅक्टोबरपर्यंत माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असं मुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा नमूद केले आहे.मात्र हे सव करत असताना सरकार कर्जमाफी कोणाला देंणार आणि यासाठी चार महिने अभ्यास करणार, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे, तर त्यांनी सातेत असलेल्या आणि सरकारला विरोध कर असलेल्या शिवसेनाला निशाना केले आहेत. ते म्हणाले की ' कोणत्याही पक्षावर बोलणार नाही, राज्यातली जनता सर्व बघत आहे. कोण काम करतय आणि कोण नुसत मजा पाहत आहे,' मात्र आमचे सरकार हे कोणत्याही राजकीय नेत्यासोबत शेतकरी कर्जमाफी बाबत बोलणार नाहीत तर जे खरे शेतकरी आहेत त्यांच्याशी कर्जमाफीसंदर्भात चर्चा करणार, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांशी चर्चा करणार नाही,' असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी व्यक्त केलं.