एसटीमधून भाजीपाला विनाशुल्क नेण्यासाठी निर्देश

मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (10:28 IST)
रुपये 500 आणि 1000 रुपये च्या जुन्या चलनी नोटा बाद झाल्यांनतर शेतकऱ्यांना एसटीमधून भाजीपाला विनाशुल्क नेण्यासाठी परवानगी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 
 
मुख्यमंत्री यांनी ‘वर्षा’ या निवासस्थानी विविध विभागांच्या सचिवांची एक बैठक घेऊन त्यात राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. विविध सचिव आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी यांच्याशी त्यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली. एसटी बसेसमधून प्रत्येक शेतकऱ्याला 50 किलोपर्यंत भाजीपाला कोणतेही शुल्क न आकारता नेऊ देण्यास एसटी महामंडळाने परवानगी देण्याचे निर्देश त्यांनीदिले. येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत ही सवलत लागू असेल. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचविता येणार असून, त्यातून त्यांच्या मालाला चांगली किंमत सुद्धा मिळणार आहे.

वेबदुनिया वर वाचा