देशमुख यांनी ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेबाबत दिले स्पष्टीकरण

सोमवार, 19 जुलै 2021 (23:53 IST)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. काही वर्तमानपत्रात ईडीने ३०० कोटींची जमीन जप्त करून गैरसमज पसरवले जात आहेत. मला ईडीचा समन्स आला असून त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असे स्पष्टीकरण देणार व्हिडिओ अनिल देशमुख यांचा समोर आला आहे.
 
अनिल देशमुख म्हणाले की, ‘ईडीने माझ्या परिवाराची अंदाजे ४ कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. त्या ४ कोटींच्या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये माझा मुलगा सलील देशमुख याने २ कोटी ६७ लाखांची २००६ मध्ये जी जमीन घेतली होती. ती २ कोटी ६७ लाखांची जमीनसुद्धा जप्त केली आहे. पण काही वर्तमानपत्रामध्ये २००६ साली सलील देशमुखची २ कोटी ६७ लाखांची जमीन ३०० कोटींची दाखवून म्हणजेच ईडीने ३०० कोटींची जमीन जप्त केल्याचे सांगून गैरसमज पसरवण्यात येत आहेत. तसेच मला ईडीचा समन्स आला होता. त्यानंतर मी रितसरपणे सुप्रीम कोर्टात माझे याचिका दाखल केली आहे. त्याचा आता जो काही निकाल येईल किंवा कोर्टाचा जो काही निकाल येईल तो निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीसमोर माझा जबाब द्यायला जाणार आहे.’

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती