उदय सामंत म्हणाले, "रानडे इन्स्टिट्यूटची जागा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे भाडेतत्त्वावर आहे. ही जागा विद्यापीठाच्या नावावर, विद्यापीठाच्या मालकीची होण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच रानडे इन्स्टिट्यूटच्या टेक्निकल अपग्रेडेशनसाठी स्टुडिओ आणि इतर सुविधांसाठी देखील कुलगुरुंसोबत चर्चा झाली. त्यासाठी शेजारच्या इमारतीत सोय करता येईल"
"रानडे इन्स्टिट्यूटमधे काळानुरूप जे बदल करायचे आहेत यासाठी उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांमधे अहवाल देईल. त्यानंतर रानडे इन्स्टिट्यूटसाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या केल्या जातील," असे देखील उदय सामंत या वेळी म्हणाले.